Fri, Sep 21, 2018 00:11होमपेज › Belgaon › मराठा समुदाय भवनसाठी १६ लाख

मराठा समुदाय भवनसाठी १६ लाख

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 7:46PMनिपाणी : प्रतिनिधी

चिखलव्हाळ येथे आ. गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारची शाश्‍वत विकासकामे झाली आहेत. यामध्ये राजीव गांधी सेवा केंद्राचे काम चांगले झाले आहे.येथे उद्घाटन होत असलेल्या मराठा समुदाय भवनाच्या दुसर्‍या मजल्याच्या कामासाठी पुन्हा सरकारकडून 16 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. प्रकाश हुक्केरी यांनी दिली.

चिखलव्हाळ येथे 30 लाख खर्चून बांधलेल्या मराठा समुदाय भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. गणेश हुक्केरी, वीरकुमार पाटील, काका पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, गोपाळ पाटील, ता. पं.अध्यक्षा उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.खडकलाट जि. पं. सदस्या स्नेहलता पाटील यांच्या  हस्ते फीत कापून भवनाचे उदघाटन करण्यात आले. स्वागत ग्रा. पं. अध्यक्ष माणिक पाटील यांनी केले.

खा. हुक्केरी म्हणाले, येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मराठा भवन समुदाय भवनाची निर्मिती चांगल्या प्रकारे झाली आहे. हे भवन जिल्ह्यातील देखणे ठरले आहे. 

आ. गणेश हुक्केरी म्हणाले, गेल्या पाच वर्षात कर्नाटकात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने भरीव विकासकामे केली आहेत. गोरगरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. याचा राज्यातील जनतेला सर्वाधिक लाभ झाला आहे. काका पाटील, स्नेहलता पाटील, खडकलाट ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील यांंनीही विचार मांडले.

कार्यक्रमास तंबाखू उद्योजक बी. रमेश पै, विजय पाटील, श्रीनिवास पाटील, सुंदर पाटील, बापूसो पाटील, जि. पं. सदस्या शैलजा कागे, ग्रामस्थ उपस्थित होते. पी. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.