Mon, Nov 19, 2018 23:28होमपेज › Belgaon › ‘पाटबंधारे’त १५९ कोटींचा घोटाळा?

‘पाटबंधारे’त १५९ कोटींचा घोटाळा?

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:41AMबंगळूर : वृत्तसंस्था

काँग्रेसशासित कर्नाटकातील सर्व खात्यांमध्ये भ्रष्टाचार असून पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील यांचा अप्पर भद्रा प्रकल्पांतर्गत कामे मंजूर करण्यासंदर्भात 159 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी एम. बी. पाटील यांची त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी, करावी अशी मागणीही त्यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी  बोलताना केली.
येडियुराप्पा म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या विश्‍वेश्‍वरय्या जल महामंडळाकडून नॅशनल प्रोजेक्टस कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेडला (एनपीसीसी) मोठ्या कामाचे कंत्राट देण्यात आले. परंतु, या कंपनीने यापूर्वी केलेली कामे म्हणून बनावट प्रमाणपत्रे सादर केली आहेत. 

या प्रकल्पासाठी फक्‍त दोन कंपन्यानी अर्ज केला होता आणि या कंपन्यानी प्रकल्पाच्या किमान अर्ध्या रकमेची कामे पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे देण्याची आवश्यकता होती. एनपीसीसी कंपनीने मणिपूरच्या पाटबंधारे आणि पूरनियंत्रण खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने 124 कोटी रुपयांचे काम केल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. अन्य कंपनीने त्रिपुरा येथील हिंदुस्थान स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन कंपनीचे 28 कोटीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.

या भ्रष्टाचाराला सिध्दरामय्या सरकार आणि पाटबंधारे मंत्री एम.बी.पाटील यांचा सहभाग आहे. या प्रकरणी पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांना निलंबित करावे आणि एम. बी. पाटील याना त्वरीत मंत्री मंडळातून डच्चू द्यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत  - बी. एस. येडियुराप्पा

 

Tags : Upper Bhadra Project,scam, M. B. Patil, B. S. Yeddyurappa,