होमपेज › Belgaon › निपाणीजवळ दीडशे किलो चांदी जप्त

निपाणीजवळ दीडशे किलो चांदी जप्त

Published On: Feb 03 2018 1:07PM | Last Updated: Feb 03 2018 1:07PMनिपाणी : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कुर्ली फाट्यानजीक निपाणी ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने बेकायदा तस्करी करणार्‍या तिघा संशयितांना दीडशे किलो चांदीसह ताब्यात घेतले आहे. 

ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. पोलिसांनी कारसह सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, कारमधील तिघेजण मुंबईहून बंगळूरकडे जात होते. याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दयानंद पवार, सीपीआय किशोर भरणी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीणचे फौजदार निंगणगौडा पाटील यांनी सहकार्‍यांसह सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेत चौकशी चालविली आहे. गेल्या दोन वर्षातील ही तिसरी कारवाई आहे.