Wed, Nov 21, 2018 08:10होमपेज › Belgaon › निपाणी पालिकेत १४१ जागा रिक्‍त

निपाणी पालिकेत १४१ जागा रिक्‍त

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 8:40PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी नगरपालिकेत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या 236 पैकी तब्बल 141 जागा रिक्‍त आहेत. परिणामी प्रशासकीय कारभाराचे नियोजन कोलमडले असून केवळ 95 अधिकारी व कर्मचार्‍यावर कामाचा ताण पडत आहे.

सहायक कार्यकारी अभियंता,  सीनिअर प्रोग्रॅमर, सहायक अभियंता, पर्यावरण अभियंता, अकौंटंट सुपरिटेंडेंट, कम्युनिटी अफेअर्स  ऑफिसर, अकौटंट, ऑफिस मॅनेजर, महसूल अधिकारी या जागा अनेक दिवसांपासून रिक्‍तच आहेत.

पालिकेचे सहायक कार्यकारी अभियंता पी. जे. शेंडुरे यांची निवडणूक काळात बदली झाल्याने नवे अभियंता येईपर्यंत ती रिक्‍त आहे. पालिकेत कनिष्ठ अभियंता तीन जागा, वरिष्ठ आरोेग्य निरीक्षक 3, एफडीए क्‍लार्क 2, कम्युनिटी ऑर्गनायझर 2, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक एक, इलेक्ट्रिशियन 1, एसडीए 5, बिल कलेक्टर 2, चालक एक, सॅनिटरी सुपरवायझर 3, स्वच्छता कामगार 60, लोडर्स 11, क्‍लिनर्स 2, गार्डनर 2 तसेच हेल्पर व वॉटर सप्लाय व्हॉल्व्हमनच्या सुमारे 17 जागा रिक्‍त आहेत. रिक्‍त असलेल्या काही जागावर हंगामी नियुक्‍ती करून काम चालविले जात आहे. शासनाने भरतीकडे दुलर्र्क्ष केले आहे. अनेक जागा रिक्‍त असल्या तरी पालिकेला कामकाज चालवावे लागत आहे. 

अपुरी स्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव....

पालिकेला सुमारे 100 स्वच्छता कामगार मंजूर असताना केवळ 43 कामगार कार्यरत आहेत. काही कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेेत. शहरात 31 प्रभाग असून शहराभोवती सुमारे 30 उपनगरे वसली आहेत. सर्व प्रभागांतून एकाच वेळी स्वच्छता होत नाही की गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत. यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या गटारी, ओढे व नाले स्वच्छ केलेले नाहीत. डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण आहेत.