Sun, Aug 25, 2019 00:07होमपेज › Belgaon › निपाणी पालिका निवडणुकीत विद्यमान 14 नगरसेवक

निपाणी पालिका निवडणुकीत विद्यमान 14 नगरसेवक

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 22 2018 12:27AMनिपाणी : राजेश शेडगे

येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 31 जागांसाठी 156 उमेदवार अर्जांच्या छानणीनंतर रिंगणात आहेत. आता किती जणांची माघार होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत विद्यमान सभागृहातील 14 नगरसेवक पुन्हा भविष्य आजमावण्यासाठी रिंगणात असून 11 नगरसेवकांचे नातेवाईकही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. 

31 ऑगस्ट रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी    सहाव्यांदा प्रवीण भाटले निवडणूक रिंगणात आहेत. चौथ्यावेळी  इम्तियाज काझी, विलास गाडीवड्डर निवडणूक रिंगणात आहेत. तिसर्‍यांदा निवडणूक रिंगणामध्ये  संजय सांगावकर,  राज पठाण, बाळासाहेब देसाई हे आहेत. शिवाय दुसर्‍यांदा नगरसेवक रवींद्र शिंदे, नम्रता कमते, सर्फराज कोल्हापुरे, धनाजी निर्मळे, नजहतपरवीन मुजावर,   निता बागडे, दत्ता जोत्रे व निता लाटकर हे आपले भविष्य आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत संधी न मिळालेल्या नगरसेवकांनी भाऊ, पत्नी, पती, दीर, मुलगा व आई किंवा अन्य नातेवाईकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहेत.

त्यामध्ये माजी नगराध्यक्षा भारती घोरपडे यांचे बंधू आकाश माने, सुषमा भाटले यांचे पती प्रवीण भाटले व दीर जयवंत भाटले, दिलीप पठाडे यांच्या पत्नी अनिता, उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या पत्नी गीता, सभापती अनिस मुल्ला यांच्या मातोश्री नगिना, जुबेर बागवान यांच्या पत्नी जस्मीन व भावजय तब्बसूम, राजेंद्र चव्हाण यांचे भाऊजी जयवंत भाटले, माजी नगराध्यक्षा सुजाता कोकरे यांचे पती किरण कोकरे, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्या पत्नी सुनिता, जायेदा बडेघर याचे सुपूत्र सर्फराज व विजय टवळे यांच्या पत्नी आशा हे या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांचे भवितव्य मतदार काय ठरविणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर हे आपली पत्नी सुनिता यांचा अर्ज वॉर्ड क्र. 24, 25 व 31 मधून भरला आहे. 2007 साली झालेल्या निवडणुकीत विजय झालेले माजी नगरसेवक माधुरी घस्ते, अजय माने, पांडूरंग चव्हाण, महादेव चव्हाण तसेच अनिल शिंदे यांच्या पत्नी सुजाता यादेखील पुन्हा रिंगणात आहेत. जुन्या सभागृहातील माजी नगराध्यक्ष भरत कुरबेट्टी व माजी नगरसेवक सुहास सूर्यवंशी हे पुन्हा आपले भविष्य आजमावत आहेत.