Sun, Jan 19, 2020 15:35होमपेज › Belgaon › 'त्या' १३ बंडखोर आमदारांनी सभापतींकडे मागितली एक महिन्याची मुदत 

'त्या' १३ बंडखोर आमदारांनी सभापतींकडे मागितली एक महिन्याची मुदत 

Published On: Jul 23 2019 9:30AM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात राजकीय अस्थिरता कायम आहे. आज, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाणार आहे. यावेळी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले जाण्याचे संकेत आहेत.
याच दरम्यान, १३ बंडखोर आमदारांनी कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आऱ. रमेश कुमार यांना पत्र लिहून विधानसभेत हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.   

सभापती के. आर. रमेश यांनी बंडखोर आमदारांना आज सकाळी ११ वाजता आपल्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावर आमदारांनी पत्र लिहून सभापतींसमोर हजर राहण्यासाठी मुदत वाढवून मागतिली आहे. 

कर्नाटकची सत्ता काँग्रेस-निजद आघाडीकडेच राहिली किंवा भाजपकडे गेली तरी मुख्यमंत्री बदलला जाणार, हे निश्‍चित झाले आहे. मात्र सत्तेवर कोण येणार, हा निर्णय आज होऊ शकतो. विधानसभा सभापतींनी सरकारविरोधी भूमिका घेऊनही काँग्रेस आणि निजदने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत विश्‍वासदर्शक ठरावावर आणखी एक दिवस चर्चा करण्याची मागणी सोमवारी रात्रीपर्यंत लावून धरली. परिणमी रात्री पावणेबाराच्या सुमारास सभापतींनी ही मागणी मान्य करताना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाईल, असे जाहीर केले.