Sun, May 26, 2019 11:33होमपेज › Belgaon › बारावी परीक्षेला आजपासून प्रारंभ

बारावी परीक्षेला आजपासून प्रारंभ

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:23AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात आज गुरुवार दि. 1 मार्चपासून बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ होत आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा मंडळाने जय्यत तयारी केली असून सर्व केंद्रांवर यावेळेला प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24 हजार 066 तर संपूर्ण राज्यभरात 6 लाख 90 हजार परीक्षार्थी आहेत. 

प्रत्येक केंद्रावर कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान विभागाचे एकूण 24,066 परीक्षार्थी आहेत.  उद्यापासून 17 मार्चपयर्ंत बारावीची परीक्षा होत आहे. जिल्ह्यात एकूण 34 परीक्षा केंद्रे असून बेळगाव शहरात 17  आहेत. यापैकी सरकारी महाविद्यालयात 5, अनुदानित महाविद्यालयात 10 व विनाअनुदानित महाविद्यालयात 2 केंद्रे आहेत. कला विभागात 8,650, वाणिज्य विभागात  8,885 व विज्ञान विभागात 6,531 परीक्षार्थी आहेत. त्यापैकी 12,687 विद्यार्थी 11,379 विद्यार्थिनी आहेत. यंदा कन्नड माध्यमाचे 11,786, इंग्लिश माध्यमाचे 12,280 परीक्षार्थी आहेत. 

2016 मध्ये बारावी परीक्षेच्या विज्ञान विभागातील दोन विषयांच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांना दोनवेळा पेपर लिहावा लागला होता. त्यावेळी तब्बल महिनाभर परीक्षा चालली. याबाबत आता खबरदारी घेण्यात आली आहे. कॉपीमुक्तसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. 

राज्यात एकूण 1004 परीक्षा केंद्रे आहेत. 3 लाख 52 हजार 292 विद्यार्थी आणि 3 लाख 37 हजार 860 विद्यार्थिनी आहेत. सर्व परीक्षा केंद्रांच्या 200 मी. अंतरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे.