Mon, Nov 19, 2018 06:19होमपेज › Belgaon › ...तर शेतकर्‍यांना कृषी कर्जावर १२ टक्के व्याज!

...तर शेतकर्‍यांना कृषी कर्जावर १२ टक्के व्याज!

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 18 2018 12:08AMबंगळूर : प्रतिनिधी  

गेल्या वर्षी शेतकर्‍यांनी शून्य टक्के व्याज दरावर सहकारी पतसंस्थांकडून कृषी कर्ज घेतले होते. त्याची परतफेड काही शेतकर्‍यांनी केलेली नाही. त्यावर आता 17 जूनपासून शून्यऐवजी 12 टक्के व्याज भरावे लागण्याचे संकेत आहेत.

कर्जफेड न केलेले शेतकरी नवीन पीक कर्जासाठी अपात्र ठरणार आहेत. कर्जफेड न केलेले शेतकर्‍यांचे लक्ष विद्यमान युती सरकारकडून अपेक्षित असलेल्या कर्जमाफीच्या घोषणेकडे आहे. कुमारस्वामी यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू, असे आश्‍वासन दिले होते.