होमपेज › Belgaon › मतदानासाठी 12 पर्यायी ओळखपत्रे

मतदानासाठी 12 पर्यायी ओळखपत्रे

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:23PMबेळगाव : प्रतिनिधी

मतदानाला एक दिवसाचा अवधी  शिल्लक राहीला असून 12 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र सक्तीचे असले तरी, मतदार यादीत नाव असेल तर, मतदान ओळखपत्राशिवाय 12 पर्याय शासनाने जाहीर केले आहेत. त्यापैकी कोणताही एक पर्यायाचा उपयोग करुन मतदानादिवशी मतदान करता येते.यंदा विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असून प्रत्येक मतदार संघात 100 टक्के मतदान करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मतदार यादीप्रमाणे मतदारांचा शोध घेऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे. परराज्यात वास्तव करुन असलेले, बाहेर गावी कामानिमित्त गेलेल्या मतदारांना मतदानादिवशी येऊन मतदार करण्याचे आवाहन मोबाईलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते, बुथ कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कार्यकर्ते आपल्या मतदार क्षेत्रात शंभर टक्के मतदान कसे होईल यावर लक्ष केंद्रित करुन आहेत. 

शासनाने दिलेल्या 12 पर्यायाची सत्य प्रत निवडणूक अधिकार्‍यांना दाखविणे गरजेचे आहे. त्याची झेरॉक्स प्रत ग्राह्य मानली जाणार नाही. मतदान हा तुमचा हक्क आहे. तो तुम्ही बजावा. सरकार स्थापन करण्याची ताकत लोकशाहीमध्ये असून भारतात लोकशाही तत्वावर सरकार चालते. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. यंदा शासकीय पातळीवर व पक्षातर्फे मतदार जनजागृती करण्यात आली. विद्युत बील, पाणी बील, बसप्रवास तिकीट, मोबाईल, मेलआयडी, फेसबुक, विविध वेबसाईटवर मतदारांना 12 मे रोजी मतदान करण्यासबंधी आवाहन करण्यात आले आहे. यंदा मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनच्यामार्फत आपण मतदान कुणाला केले आहे याची खात्री करण्यासाठी मतदान झाल्यानंतर पाहण्याची सोय आहे. त्यामुळे मतदान  केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावरती निवडणूक अधिकारी व भरारी पथक लक्ष ठेऊन राहणार आहेत.  

यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चालेल

1. पासपोर्ट, 2.वाहन चालक परवाना, 3. केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी कंपनीत कार्यरत असलेले फोटो ओळखपत्र, 4. फोटो असणारे बँक खाते,  5. पॅन कार्ड. 6.स्मार्ट कार्ड, 7. रोजगार हमी योजना ओळखपत्र, 8. राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना ओळखपत्र, 9.फोटो असलेली पेन्शन कागदपत्रे, 10. निवडणूक आयोगाकडून मिळालेली मतदार स्लीप, 11.कार्यालयीन ओळखपत्र, 12. आधारकार्ड