Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Belgaon › पोलिसांसाठी 11,000 घरांची निर्मिती 

पोलिसांसाठी 11,000 घरांची निर्मिती 

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMचिकोडी : प्रतिनिधी

राज्यात कार्यरत एक लाख पोलिसांना निवार्‍याची समस्या सोडविण्यासाठी 2223 कोटींच्या निधीतून सुमारे 11,000 घरांची निर्मिती केल्याची माहिती गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली.
सदलगा येथे नूतन बसस्थानक बांधकामाचे भूमिपूजन व पोलिस वसतिगृह व रयत संपर्क केंद्र  उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते म्हणाले, यंदाच्या वर्षात 4,000 घरांची निर्मिती तर एकूण 11,000 घरांची निर्मिती करुन पोलिसांच्या निवार्‍याचा प्रश्‍न सोडविला आहे.  मागील भाजप सरकारने केवळ 12,000 कर्मचार्‍यांची पदे भरली होती. पण आपण 32,000 कर्मचार्‍यांची पदे भरली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या पध्दतीने राखण्यात आला आहे.चिकोडी केएआरटीसी विभागात 50 कोटीहून जास्त निधींची कामे खा.हुक्केरी यांनी आणली आहेत. एकसंबात पोलिस स्थानक लवकरच मंजूर करु.

परिवहन मंत्री एच.एम.रेवण्णा म्हणाले, भारतात उत्कृष्ट परिवहन सेवा देवून 207 राष्ट्रीय पुरस्कार राज्याने प्राप्त केले आहेत. देशात नव्या बसेसची निर्मिती झाल्यास सर्वात आधी त्या कर्नाटकास मिळतात.  राज्यात 460 नव्या बस, 10 इंदिरा कँटीन व इंदिरा क्लिनीक  सुरु करण्यात आली आहेत. या विभागात 27900 पदे भरण्यात आली आहेत. . महिलांना वाहन चालक परवाना देण्यात येणार आहे. बस स्थानकांसाठी 2200 कोटींचा निधी दिला आहे. 

खा.हुक्केरी म्हणाले, लोकसभा व्याप्तीत 28 कोटी खर्चून हायटेक बस स्थानकांची निर्मिती केली जात आहे. तालुक्यात अंकली 12, चिकोडी 24, सदलगा 24 असे एकूण 60 पोलिस वसतीगृहांची निर्मिती केली.श्रावणबेळगोळला जाण्यासाठी जैन धर्मियांना एक बसला सुमारे 50 हजार खर्च येत असून, 100 गाड्यांसाठी आपण अर्धा खर्च  तर उर्वरित अर्धा खर्च सरकारने उचलावा. 
यावेळी संसदीय सचिव आ.गणेश हुक्केरी, आ.अशोक पट्टण, केएसआरटीसीचे अध्यक्ष सदानंद डंगनवर, अजय सूर्यवंशी, आ.महांतेश कवटगीमठ, कल्लाप्पण्णा मगेन्नवर, लक्ष्मण चिंगळे, अण्णासाहेब गुंडकल्ले, अनिल पाटील, रवि मिर्जे  आदी उपस्थित होते.