Wed, Apr 24, 2019 20:14होमपेज › Belgaon › १० संशयितांना जामीन; चौघांवर बॉडी वॉरंट

१० संशयितांना जामीन; चौघांवर बॉडी वॉरंट

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:50PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली, भडकल गल्लीमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी मार्केट पोलिसांनी 14 जणांवर खटला दाखल केला आहे. त्यांपैकी 10 जणांना येथील बेळगाव जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर चारजणांना पोलिसांनी बॉडी वॉरंट घेतला आहे. सर्व आरोपींवर मार्केट पोलिसांनी भादंवि 147, 148, 153 (ए), 332, 307, 427, 435, 353 सहकलम 149 व केपीडीपी कायदा, कलम 2 (ए), (बी) नुसार खटला दाखल केला आहे. 

50 हजार रुपयांची वैयक्‍तिक हमी व तितक्याच रकमेचे दोन जामीन, साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न करू नये, तपास अधिकार्‍याला सहकार्य करावे, पुन्हा समान गुन्हा  करू नये, रोज सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पोलिस स्थानकात हजेरी देण्यात यावी. या अटींवर त्यांची जामीनावर मुक्‍तता करण्याचा आदेश न्यायाधीशांनी बजाविला आहे. यापूर्वी खडेबाजार पोलिसांनी या सर्व आरोपींवर खटले दाखल केले आहेत. त्यामध्ये त्यांना यापूूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीनावर मुक्‍तता करण्यात आलेल्यांमध्ये तुषार शिवाजी शिंदे (वय 36, रा. भडकल गल्ली), रामा महादेव गुलाबकर (वय 34), रोहन महादेव शिंदे (वय 18) दोघेही रा. रा. भडकल गल्ली, प्रितेश मदन गौंडवाडकर (वय 24, रा. चव्हाट गल्ली), प्रशांत बसवंत मोरे (वय 22, रा. गणाचारी गल्ली), कुलदीप किशन ताशिलदार (वय 28) रा. टेंगिनकेरा गल्ली, प्रशांत अर्जुन पाटील (वय 23, रा. कणबर्गी), गणेश सुरेश दिलावर (वय 24, रा. रामनगर कंग्राळी खुर्द), निकेश अशोक कांबळे (वय 26, रा. खडक गल्ली) यांचा समावेश आहे. प्रसाद इंद्रकुमार शिरोळकर (वय 29, रा. खडक गल्ली), शुभम शंकर कंग्राळकर (वय 21, रा. खडक गल्ली), संजू ऊर्फ संजय महादेव जाधव (वय 30, रा. खडक गल्ली) व राहुल यल्‍लाप्पा जाधव (वय 42) रा. खडक गल्ली यांना पोलिसांनी बॉडीवॉरंट घेऊन आपल्या ताब्यात घेतले आहे.  आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रताप यादव  काम पाहत आहेत.