होमपेज › Belgaon ›  ...म्हणे मराठी वर्चस्व वाढेल

 ...म्हणे मराठी वर्चस्व वाढेल

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 18 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याचे त्रिभाजन करून चिकोडी आणि गोकाक या दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन सोयीचे होण्यासाठी जिल्हा फोडण्याची गरज असताना आता त्यात कन्‍नड संघटनांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. बेळगाव जिल्हा फोडल्यास शिल्लक बेळगाव जिल्ह्यात मराठी लोकांचे वर्चस्व वाढेल, अशी कोल्हेकुई त्यांनी सुरू केली आहे.
शनिवारी कन्‍नड संघटनांच्या काही नेत्यांनी कन्‍नड साहित्य भवनात पत्रकार परिषद घेऊन जिल्हा फोडण्यास विरोध केला. सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत जिल्हा अखंड ठेवावा, जेणेकरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व वाढणार नाही, असाही दुराग्रह कन्‍नड नेत्यांनी केला.

कन्‍नड नेते अशोक चंदरगी, सिद्धनगौडा पाटील  म्हणाले, ‘जिल्ह्याचे विभाजन झाल्यास कन्‍नड संघटनांचा प्रभाव कमी होऊन मराठीचे वर्चस्व वाढेल. सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहेे. हा प्रश्‍न सुटेपर्यंत जिल्ह्याचे विभाजन होऊ नयेे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कन्‍नड संघटनांना विश्‍वासात न घेता मनमानी कारभार चालविला आहे. माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल  यांनी सुद्धा विभाजनाला विरोध दर्शविला होता. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत विभाजन करू नये, विभाजन झाल्यास बेळगाव जिल्ह्यास महाराष्ट्र एकीकरण समितीचे 
वर्चस्व वाढेल आणि कन्‍नडींगाना सत्तेसाठी झगडावे लागेल.’

URL :