जांभूळ का चिकटले नाही?

Published On: Jun 23 2019 1:16AM | Last Updated: Jun 22 2019 8:46PM
Responsive image


प्रा. अनुराधा गुरव

‘ईज हेल्थ इज लॉस्ट
समथिंग इज लॉस्ट,
ईफ वेल्थ इज लॉस्ट

नथिंग ईज लॉस्ट, ईफ कॅरॅकटर ईज लॉस्ट एव्हरीथिंग ईज लॉस्ट,’ या विचारांना प्राचीन काळापासून मानवाच्या संस्कृतीचा कणा मानतात. रामायण-महाभारतामध्ये हे विचार कसे रूजले गेले याच्या संस्कार कथा आजही शिरोधार्य ठरतात. पाच पांडव आणि द्रौपदी यांना 12 वर्षांच्या अज्ञातवासांनतर वनवासासाठी रानावनात राहावे लागले. त्यांच्या चारित्र्याची, सुसंस्कृतपणाची, सर्व प्रकारच्या परिपक्वतेची कठोर परीक्षा घेणार्‍या प्रसंगांना सामोरे जावे लागले. एकदा जांभळाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी सहा जण बसले होते. ग्रीष्म ऋतू होता. जांभळे विपुल लागलेली. पिकलेली. झुळूक येताच भुईवर टपटपत होती. भूक भागविण्यासाठी सर्वांनी ती पोटभर खाल्ली. जांभूळ झाडावर फेकून झाडाला चिकटते का, हे पाहण्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. पुण्यवान, चारित्र्यसंपन्न, सत्यवान असणार्‍याचे जांभूळ झाडाला परत चिकटणार होते. धर्मराजाने परीक्षा देण्यास नकार दिला. कौरव-पांडवांचे युद्ध सुरू असताना एक हत्ती भीमाने मारला.

‘युद्धात कोण कामी आले?’ या प्रश्‍नाला सत्य उत्तर देण्याऐवजी धर्मराजाने माणूस अथवा हत्ती यापैकी एक जण बळी गेला, असे संदिग्ध उत्तर दिले होते. सत्यवचनी धर्मराजाने सत्य न बोलण्याचे पाप केलेले.

भीम आणि जरासंधाचे द्वंद सुरू असताना भीमाने जरासंधाला उभे चिरले तरी पुन्हा शरीराचे मधून वेगळे झालेले दोन भाग जुळवून तो जिंवत पुन्हा होऊन लढत होता. श्रीकृष्णाने भीमाला खूण केली. दोन भाग दोन्ही बाजूस फेकण्यास सूचना दिली. हाताची खूण केली. भीमाने कृष्णाची आज्ञा पाळली. जरासंधाचा डावा भाग उजवीकडे फेकला, उजवा डावीकडे टाकला. जरासंधाची हार झाली. भीमाचा जय झाला.

भीमाने हे पाप केले म्हणून त्याचे जांभूळ झाडाला चिकटविण्याची आज्ञा केली नाही. अर्जुनाने एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण करण्यासाठी विराट राजाच्या पदरी बृहभडा नावाने नर्तिका म्हणून चाकरी करून असत्य वर्तन केले. या पापामुळे त्याने माघार घेतली. नकुल-सहदेव माद्रीदेवीला झालेले पुत्र पंडू राजाला पंडुरोग कोडारोग झाल्यानंतर जन्मलेले होते.शाप मिळाल्यानंतरही केलेले पाप माथी असलेले त्या दोघींनी नकार दिला.

द्रौपदीने आपल्या पुण्याईच्या बळावर प्रयत्न केला. जांभूळ झाडाच्या फांदीपर्यंत उचललेल्या; मात्र चिकटले गेले नाही. चारित्र्यसंपन्न द्रौपद्रीने कोणते पाप केले होते? तिचे शील का डागाळले गेले होते? सत्यवचनी द्रौपदीने आपले पाप स्पष्ट केले. कुंतीमातेचा कर्ण हा पंडुराजाशी लग्न होण्यापूर्वी सूर्यापासून झालेला पुत्र होता. त्याचे मातृत्व नाकारले; मात्र द्रौपद्रीला पहिल्या कुंतीपुत्राच्या पत्नीत्वाबद्दल मोह निर्माण झाला. कार्णाचे पतीत्व मिळू शकले नाही, याबद्दल खंत वाटली. ते पाप द्रौपद्रीला चारित्र्यहीन ठरविणारे होते.

द्रौपद्रीने पाप स्पष्ट केले. जांभूळ फांदीला क्षण भरात चिकटले. कर्णाची पत्नी होण्याची फक्त मनामध्ये विचार आला. ते पाप चारित्र्याला डागळणारे होते. हे द्रौपद्रीने पांडवांसमोर धैर्याने मान्य केले. ती शीलसंपन्न ठरली. तिची ताकद महाभारतामध्ये गौरविली गेली.