Sun, Jul 21, 2019 16:17
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन

जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:15AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड आणि शिपाई भाऊसाहेब वाघ यांच्यासोबत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी धक्‍काबुक्‍की केली. यात वाघ जखमी झाले, तर राठोड यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याची सीआयडी चौकशी व्हावी, जि. प. आणि पंचायत समिती कार्यालयांत अनधिकृत व्यक्‍तींना अटकाव करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. 6) कामबंद आंदोलन केले.

दीड महिन्यापूर्वी जि. प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्या कार्यालयात मद्यपीने गोंधळ घालत कामकाजात अडथळा आणला होता. त्यापाठोपाठ सोमवारी (दि. 5) औरंगाबाद पंचायत समितीचे बीडीओ राठोड यांच्या दालनात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याच्या निषेधार्थ जि. प. तील अधिकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. सीईओ मधुकरराजे आर्दड आणि पोलिस आयुक्‍तांना निवेदन दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जाधव, कार्यकारी अभियंता विनायक पांढरे, संजय कुलकर्णी, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सचिव प्रदीप राठोड, अध्यक्ष सुरेश गायकवाड, शरद भिंगारे, साहेबराव शेळके, पी. एस. पाटील, एम. सी. राठोड, मकरंद पाखरे, भाऊसाहेब सोनवणे, एस. डी. साळवे, डी. एम. साळवे आदी उपस्थित होते.