होमपेज › Aurangabad › खुलताबाद तालुक्यात मराठा आरक्षणसाठी एकाची आत्महत्या

खुलताबाद: मराठा आरक्षणसाठी एकाची आत्महत्या

Published On: Sep 11 2018 4:16PM | Last Updated: Sep 11 2018 4:16PMखुलताबाद : प्रतिनिधी  

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील किशोर शिवाजी हरदे (२६) तरुणाने मंगळवारी (दि११)मराठा आरक्षणसाठी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे वृत्त कळताच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात खुलताबाद तहसील कार्यालयात जमले होते. दरम्यान, किशोरच्या आत्महत्येनंतर गल्लेबोरगाव येथील बाजारपेठ बंद करण्यात आली होती.  

किशोर हा येवला (जि.नाशिक) येथे एका खाजगी कंपनीत काम करीत होता. पोळासणासाठी तो गावाकडे आला होता. आरक्षण नसल्यामुळे आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाहीत असे तो मित्र व नातेवाईकांना सांगत असत. नैराश्यापोटी आज किशोर यानें गळफास घेऊन आत्महत्या केली. किशोर याचा पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

 ...तर मी आत्महत्या केली नसती

मृत किशोर याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात ही आत्महत्या नसून ,खून आहे आणि तो सरकारने केला आहे. मराठा आरक्षण लवकर दिले असते तर मी आत्महत्या केली नसती. आपला किशोर हरदे असा मजकूर चिठ्ठी मध्ये  लिहला आहे.