Tue, Sep 25, 2018 00:49



होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये धनगर आरक्षणाचा पहिला बळी

औरंगाबादमध्ये धनगर आरक्षणाचा पहिला बळी

Published On: Aug 04 2018 3:29PM | Last Updated: Aug 04 2018 3:29PM



पैठण : प्रतिनिधी

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षण आंदोलनाचाही पहिला बळी गेला आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे एका तरुणाने आत्‍महत्या केली. परमेश्वर घोंगडे असे आत्‍महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पालकांचे जबाब सुरू आहेत. 

परमेश्वर याने १ ऑगस्‍ट रोजी पुण्यात धनगर आरक्षणासाठीच्या मेळाव्यात जाण्यासाठी घरात पैसे मागितले. मात्र घरची परिस्‍थिती हालाकीची असल्याने पालकांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर ३ ऑगस्‍ट रोजी परमेश्वरने चिठ्ठी लिहून ठेवून आत्‍महत्या केली. यामध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण तात्‍काळ लागू करावे, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, आई-वडिलांनी परमेश्वरने धनगर आरक्षणासाठीच आत्‍महत्या केल्याचे म्‍हटले आहे. त्यानंतर धनगर समाजातील लोक आक्रमक झाले असून पोलिस ठाण्यासमोठ ठाण मांडून बसले आहेत.