Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Aurangabad › शिकवणी न लावता झाला फौजदार

शिकवणी न लावता झाला फौजदार

Published On: Jun 23 2018 8:05AM | Last Updated: Jun 23 2018 8:05AMपिंपळवाडी ः प्रतिनिधी

अनेकवेळा अपयश येऊनही खचून न जाता आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएस्सी) घेण्यात आलेल्या फौजदार (पीएसआय) पदासाठीच्या परीक्षेत हरिविजय शिवनाथ बोबडे याने मिळविले. या परीक्षेत तो 15 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्याने या परीक्षेसाठी कुठलाही शिकवणी वर्ग लावला नाही.

पैठण तालुक्यातील धनगाव येथील शेतकर्‍याचा मुलगा असलेला हरिविजय 2011 पासून स्पर्धा परीक्षा देत होता. त्याने पोलिस उपनिरीक्षक , एसटीआयसह अनेक परीक्षा दिल्या, मात्र त्याला अपयश येत राहिले. पुन्हा 2015 मध्ये त्याने नव्या जोमाने पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली, परंतु अवघ्या दोन गुण कमी पडल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे त्याचे स्वप्न भंगले. तरीदेखील त्याने हार मानली नाही. पुन्हा त्याने प्रचंड मेहनत घेतली.

अनेकवेळा अपयश येऊनही खचून न जाता मुलगा पोलिस अधिकारी व्हावा, हे आई-वडिलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने पुन्हा 2016 मध्ये ही परीक्षा दिली. अखेर त्याला या परीक्षेत यश मिळाले. या परीक्षेत तो 15 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्याने या परीक्षेसाठी कुठलाही शिकवणी वर्ग लावला नाही.

दरम्यान, धनगाव व एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेेश्वर पायघन, फौजदार राहुल पाटील, सरपंच बापूसाहेब कातबने, चेअरमन काका कनसे, जि. प. सदस्य साईनाथ सोलाट, उपसरपंच योगेश बोबडे, विष्णू नाचन, सुशील बोडखे, दादासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.