Wed, Nov 21, 2018 01:24होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार

औरंगाबाद : अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

नादुरुस्त दुचाकी ढकलत नेताना भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी ढकलत नेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.   बीडबायपासवरील एमआयटी ते महानुभाव चौकदरम्यान एका हॉटेलजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय थोरात (वय : 19, रा, कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. बीडबायपास रस्त्याने जाताना त्याची दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे तरुण दुचाकी ढकलत एमआयटीकडून महानुभाव चौकमार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याने कांचनवाडीला  जात होता. याच दरम्यान महानुभाव चौकाकडे भरधाव वेगात कार (एम. एच. 48,  ए. सी.  8935) जात होती. पुढे दुचाकी घेऊन तरुण पायी जात असल्याची बाब कार चालकाला लक्षात आली नाही. अचानक दुचाकी व तरुण समोर पाहून चालकाने कार नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला, परंतु कारची गती एवढी जास्त होती की ती कार दुचाकी ढकलत नेणाऱ्या तरुणाला जोरात धडकली. यात तरुण जागीच ठार झाला.

या घटनेनंतर चालक आणि आतील काहीजण पसार झाले. अपघाताची बाब समजताच घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी अपघाताची माहिती सातारा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोचले त्यांनी कार ताब्यात घेतली असून या घटनेची नोंद सातारा ठाण्यात झाली.

 

Tags : Aurangabad, Aurangabad news, accident, young biker, young boy died 


  •