औरंगाबाद : प्रतिनिधी
बाळकृष्णनगर-शिवनेरी कॉलनी वॉर्डातील महिलांनी पाण्यासाठी मंगळवारी आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर धडक दिली. मनपाच्यावतीने टँकरने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या महिलांनी आमदारांकडे केली. तसेच आठवडाभरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर हंडा मोर्चा काढू, असा इशाराही दिला.
बाळकृष्णनगर-शिवनेरी कॉलनी वॉर्डातील बर्याच वसाहतींमध्ये मनपाची नळ योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे या भागात मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून चार-चार दिवस टँकरने पाणी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी मंगळवारी आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनात राजू शेळके यांच्यास प्रणीला त्रिभूवन, मीना शेळके, कमल बडक, कांताबाई राठोड, सुवर्णा पिल्ले, शिला गाडेकर, सुरेखा घोरपडे, शारदा शिंदे आदी सहभागी झाले होते.