Fri, Sep 21, 2018 00:08



होमपेज › Aurangabad › मुलाला शोधण्यासाठी गेलेल्या मातेची छेडछाड

मुलाला शोधण्यासाठी गेलेल्या मातेची छेडछाड

Published On: Jan 25 2018 10:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:16AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

मुलगा घरी आला नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी दुसर्याच्या घरात गेलेल्या आईची छेड काढण्यात आली. हा प्रकार मुकुंदवाडीत 22 जानेवारी रोजी घडला. या प्रकरणी 32 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून तीन महिलांसह अभिमान खरात याच्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. मुलाच्या शोधात आलेल्या पीडितेला एका महिलेने हाताला धरून घरात नेले. तेथे आरोपी अभिमान खरात याने तिचा विनयभंग केला. तसेच, इतर तीन महिलांनी पीडितेला मारहाण केली.