Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Aurangabad › अनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत

अनैतिक संबंधाचे कारण...शेजारी असणारे शेत

Published On: Dec 13 2017 11:12AM | Last Updated: Dec 13 2017 11:12AM

बुकमार्क करा

सल्लोड : प्रतिनिधी

तालुक्यातील मोढा बु. येथील रहिवासी असलेल्या पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. वडिलासोबत असलेल्या अनैतिक संबधांच्या संशयावरून एका तरुणाने मित्राच्या मदतीने या महिलेचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना मंगळवारी अटक केली आहे.

समाधान पंढरीनाथ ढोरमारे (19), पंढरीनाथ जनार्दन ढोरमारे (54),  गोपीनाथ जनार्धन निकम (22, सर्व रा. रा मोढा बु. ता. सिल्‍लोड) असे खून करणार्‍या आरोपींचे नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेचे शेत गावापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. तिच्या शेतात जाण्यासाठी पंढरीनाथ ढोरमारेच्या शेतातून जावे लागते. शेजारीच शेत असल्याने पंढरीनाथ व पार्वतीबाईचे अनैतिक संबध होते, असा संशय पंढरीनाथचा मुलगा समाधान याला होता. दरम्यान, मुलाने अनेकवेळा बाप व त्यांच्या प्रेयसीला समजावून सांगितले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. रविवारी सकाळी पित्यासह सदर महिलाही सिल्लोडच्या आठवडी बाजारासाठी मोटारसायकलवर बसून आले. या बाजारात पंढरीनाथ याने प्रेयसीला कपडे घेऊन दिले. याबाबतची माहिती समाधान याला मिळाली. त्यानंतर समाधान याने सदर महिलेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 

या दिवशीच संध्यकाळी पार्वताबाई ही बाजारातून घरी जात असताना समाधान ढोरमारे याने तिला शेतात अडविले. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. शेतात मृतदेह बघून  पोलिस आपल्यावर संशय घेतील, या भीतीपोटी समाधानने आपला मित्र गोपीनाथला शेतात बोलावून घेतले व घटनेची हकीगत सांगितली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता समाधाने मित्राकडे मदत मागितली, मात्र मित्राने नकार दिला. नंतर मैत्रीखातीर त्याने त्यांच्या शेतातून बाजूच्या भुजंगराव यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत मृतदेहाला ओढत नेले. विहिरीत मृत टाकणार तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आल्याने ते दोघे मृतदेह सोडून पळून गेले. 

सोमवारी मृतदेह सापडल्याची तक्रार पोलिस पाटलांनी सिल्लोड पोलिसांना दिली. चाणाक्षपणे मोठ्या शिताफीने पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावला.  याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अधी आकस्मात मृत्यू व नंतर पीएस.आय.संदीप सावळे  यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, श्‍वान पथक,ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना काही तासांत अटक केली.

यांनी केली कारवाई

याप्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिस अधीक्षक आरती सिंह, उपविभागीय पोलिस  अधिकारी गणेश बिरादार, निरज राजगुरू, गुन्हे  खेचे पोलिस निरीक्षक भुजंग,  सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शन खाली सिल्लोड  पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विेशास पाटील, पोलिस  उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, पोलिस कर्मचारी विलास सोनवणे, विठ्ठल चव्हाण, दादाराव  पवार, विठ्ठल डोके, विकास नायसे यांच्यासह गुन्हे शाखा पोलिसांनी परिश्रम घेतले.