Sat, Feb 16, 2019 16:50होमपेज › Aurangabad › दिसायला सुंदर नाही म्हणून पत्नीचा छळ

‘तू दिसायला सुंदर नाही’ म्हणून पत्नीचा छळ

Published On: Jan 18 2018 3:49PM | Last Updated: Jan 18 2018 3:49PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘तू दिसायला सुंदर नाही’ असे म्हणून पतीने पत्नीचा छळ केला. सोबतच पतीला नोकरी लावण्यासाठी पैसे का आणत नाही म्हणून सासरच्या लोकांनी तिला मानसिक त्रास दिला. हा प्रकार जयभवानीनगरात 31 मार्च 2016 ते 15 जानेवारी 2018 या कालावधीत घडला. या प्रकरणी मुकुंदवाडीत सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ज्ञानेश्‍वर भानुदास कांदे, भानुदास कांदे, उत्तम कांदे, रमेश नारायण गिते, भाग्यश्री अशोक केंद्रे  आणि वीरेंद्र भानुदास कांदे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा वीरेंद्र कांदे (26) हिचा 2016 मध्ये  वीरेंद्र कांदे याच्याशी विवाह झालेला आहे. लग्‍न झाल्यानंतर काही दिवसांपासून आरोपींनी पुजाचा छळ सुरू केला.  पती वीरेंद्र याने तर तिला दिसायला सुंदर नसल्याचे टोमणे मारून शिवीगाळ केली. सोबतच सासरच्या लोकांनी वीरेंद्रला नोकरी लावण्यासाठी पूजाकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावला.  हा प्रकार असह्य झाल्याने पूजा हिने अखेर मुकुंदवाडी ठाणे गाठून फिर्याद नोंदविली.  या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

फसवूणक केल्याचाही आरोप

आरोपी पती वीरेंद्रसह त्याच्या नातेवाइकांनी आमची फसवूणक केली आहे. लग्नाच्यावेळी नवरदेव अभियंता असल्याचे सांगितले होते. परंतु, तो कोठेही नोकरीला नाही, असे  फिर्यादीत म्हटलेले आहे, अशी माहिती उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी  दिली.