Mon, Jun 17, 2019 03:26होमपेज › Aurangabad › महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील : मंत्री पंकजा मुंडे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील : मंत्री पंकजा मुंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आधीच्या तुलनेत महिला बचत गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढली आहे. कुरडया, लोणचे, पापड यापुढे महिला विविध वस्तूंचे चांगले उत्पादन करीत आहेत. या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासोबतच बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अर्थसंकल्पात 36 कोटींची तरतूद करून घेतली आहे. महिलांना सुरक्षित व सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मैदानावर रविवारी (दि. 25) महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत उत्पादित वस्तूंचे विक्री व प्रदर्शन सरस महोत्सव सिद्धा 2018च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी मधुकरराजे अर्दड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव तायडे, सभापती विलास भुमरे, सभापती मीनाताई शेळके, सभापती कुसुम लोहकरे, उपआयुक्त सूर्यकांत हजारे, प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांची उपस्थिती होती. प्रदर्शनात मराठवाड्यातील 190 बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे. हे प्रदर्शन 31 मार्चपर्यंत खुले राहणार आहे. ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या की, बचत गटांची चळवळ सक्षम होणे आवश्यक आहे. 

बचत गटांच्या माध्यमातून वर्षभरात 13 सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट केवळ 5 रुपयांत देण्यात येणार आहे. या वेळी देवयानी डोणगावकर, आ. बंब यांनी विचार मांडले. प्रास्ताविकात विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी बचत गटांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तत्पूर्वी मान्यवरांनी स्वयंसहायता गटांच्या स्टॉल भेट देत पाहणी केली. तसेच कार्यक्रमादरम्यान महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन केले.
 


  •