Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : बायपासवर आणखी एक अपघात; महिला ठार

औरंगाबाद : बायपासवर आणखी एक अपघात; महिला ठार

Published On: Aug 07 2018 12:27PM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बायपासवर अपघाताची मालिका सुरुच आहे. आज सकाळी आणखी एका महिलेला अपघातात प्राण गमवावा लागला. देवळाई चौकात दुचाकीचा अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी देवळाई चौकात दुचाकीचा अपघात झाला. यात डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने अनिता विठ्ठल आल्हाट (वय २७ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला गर्भवती असल्याचे समजते.

या अपघातानंतर पोलिसांच्या गाडीतून महिलेचा मृतदेह घाटीत नेण्यात आला. अपघातानंतर चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे.