Thu, Jun 20, 2019 01:47होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : टँकर आणि रिक्षाच्या धडकेत ९ जणांचा मृत्‍यू 

औरंगाबाद : टँकर आणि रिक्षाच्या धडकेत ९ जणांचा मृत्‍यू 

Published On: May 11 2018 7:13PM | Last Updated: May 11 2018 7:13PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद-पैठण रोडवर गेवराई तांड्याजवळ पाण्याचा टँकर आणि रिक्षाची जोरदार धडक होवून झालेल्‍या अपघातात ९ जणांचा मृत्‍यू  झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखींना उपचारासाठी तात्‍काळ जवळच्या रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा अपघात झाला. 

शेख आमेर शेख मकसुद (२७, रा. जुना बाजार, औरंगाबाद), शेकू तुकाराम त्रिबंके (७५, मातोश्री वृध्दाश्रम), शिवलालसिंग गुलाबसिंग ठाकुर (८४, रा. मातोश्री वृध्दाश्रम), रामकुमारी प्यारेलाल ठाकुर (६०, रा. बिडकीन), राममहेश प्यारेलाल ठाकुर (४०, रा. बीडकीन), युवराज राममहेश ठाकूर (3, रा. बिडकीन), पुष्पा राममहेश ठाकूर (35, रा. बिडकीन), जनार्दन नाथा अवचरमल (४८, चितेगाव), अनूजा सुनिल अवचरमल (११, रा. शाहीनगर) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. 

गेवराई तांड्याजवळील बंजारा हॉटेल समोर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बिडकीन, चिकलठाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 

Tags: aurangabad, accident, water tanker,  ape rickshaw