Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Aurangabad › अधिकार्‍यांसमोर मांडल्या उपसरपंचांनी समस्या

अधिकार्‍यांसमोर मांडल्या उपसरपंचांनी समस्या

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:38AMवाळूज : प्रतिनिधी

वाळूज महानगरातील सिडको महानगर-1 मधील नागरी समस्यांसह रस्त्याचे काम येत्या दोन दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन सिडको प्रशासनाकडून मिळाले. त्यामुळे प्रलंबित समस्या सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सिडकोचे प्रशासक सेवतेकरसह मोरे, कढरे आदींनी वाळूज महानगर-1 मधील परिसरात आज भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तीसगावचे उपसरपंच विष्णू जाधव यांनी सदरील सिडकोच्या प्रशासकीय अधिकार्‍यांसमोर समस्यांचा आलेखच मांडला. त्यात दोन वर्षांपासून कम्प्लेशन न मिळणे, रस्त्यांची कामे, सिडकोच्या गार्डनची दुरवस्था, त्याचप्रमाणे या भागात लादण्यात येत असलेल्या बीअरबार दुकानाला परवानगी देऊ नये आदींचा समावेश होता. परिसराचे वैभव असलेल्या सिडको गार्डनमधील खेळण्यांची दुरवस्था झाल्याने लहान मुले गार्डनकडे फिरकत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. नागरिकांनी यावेळी असंख्य प्रश्‍न कथन करताच प्रशासक सेवतेकर यांनी सदरच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा उपसरपंच विष्णू जाधव, लक्ष्मण मुंडकर, यशवंत चौधरी, बाळासाहेब सुलताने, जोतिष मित्तल, काकासाहेब सुलताने, सुनील जगदाळे, बलवान चौधरी,  प्रमोद कंकाळे, शाखाप्रमुख कचरू साळे पाटील आदी उपस्थित होते.