Sat, Aug 24, 2019 21:43होमपेज › Aurangabad › आगीत घर जळाले; वाळूजकरांनी सावरले

आगीत घर जळाले; वाळूजकरांनी सावरले

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:34AMवाळूज : प्रतिनिधी 

येथील मुख्य महामार्गावर असलेल्या विजय अग्रवाल यांच्या घरासह दुकानाला मंगळवारी आग लागल्याच्या घटनेत साडेअकरा लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा येथील तलाठी कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. या नुकसानीमुळे खचलेल्या अग्रवाल कुटुंबास वाळूज येथील नागरिकांनी बैठक घेऊन आर्थिक मदत दिली.

वाळूजच्या जि.प. शाळेलगत विजय श्रीकिसन अग्रवाल यांच्या घरासह समोरच दुकान होते. घरास कुलूप लाऊन ते पत्नीसह मुलाला घेऊन शहरातील दवाखान्यात गेले होते. बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आग लागून त्यात त्यांचे घर व दुकान अक्षरश: भस्मसात झाले होते. यामध्ये संसार उद्ध्वस्त झाला असून केवळ अंगावरील कपडे शिल्‍लक राहिले आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी मंडळ निरीक्षक महेंद्र गिरगे, तलाठी दीपक कराळे यांनी पंच संजय खोचे, अशोक गंगवाल आदींनी घटनेचा पंचनामा तयार केला आहे. त्यात एकूण 11 लाख 50 हजारांचा ऐवज जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. चिवड्यासह शिमग्याच्या गाठी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.

याविषयी बोलताना तलाठी कराळे म्हणाले की, पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मदत किती मिळेल याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील, परंतु सानुग्रह रक्‍कम मिळेल.