Sun, Feb 17, 2019 22:05होमपेज › Aurangabad › वृक्षरोपणाचा नवा उपक्रम, विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

वृक्षरोपणाचा नवा उपक्रम, विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

Published On: Jun 28 2018 5:34PM | Last Updated: Jun 28 2018 5:34PMविहामांडवा प्रतिनिधी

जंगलतोड, वाढते शहरीकरण त्‍यातून होणारे प्रदूषण यामुळे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. ग्‍लोबल वार्मिंगची समस्‍या तर उग्र रूप धारण करत आहे. यावर वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखणे शक्‍य आहे. यासाठी पैठण येथील जगदंबा इंग्लिश स्कूल चौढाळाच्या विद्यार्थ्यांनी एक अभिनव उपक्रमातून अनोखा सीड बॉल बनवला आहे. विविध प्रजातीच्या झाडांच्या बिया जमा करुण एक सीड बॉल ची निर्मिती केली आहे. या सीड बॉलच्या माध्यमातून मोकळ्‍या जागेत वृक्षारोपण केले जाणार आहे.

जगदंबा इंग्लिश स्कूल चौढाळा ता पैठण येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या झाडांच्या बिया जमा करुण त्यातून सीड बॉल ची निर्मिती केली आहे. काळी माती व त्यात शेनखत याचे मिश्रण करुण त्यामधे कडूलिंब,चिंच,करंज या सारख्या विविध प्रजातीच्या सुमरे एक हजार बिया जमा करुण त्या मिश्रणाच्या गोल बॉल मधे टाकून सीड बॉल तयार केले आहेत. सध्या महाराष्ट्र शासन तेरा कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवून रोपांची निर्मिती करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. एक रोप बनवन्यासाठी पाच ते दहा रूपये खर्च येत आहे. परंतु सीड बॉल हे कसल्याही प्रकारचा खर्च न करता खात्रीशील वृक्ष येण्याची प्रक्रिया आहे. काळी माती व सोनखत याच्या मिश्रण करून त्‍यात बिया टाकुन हा सीड बॉल तयार केला आहे. हा सीड बॉल जर दमट वातावरणाच्या जमिनीत टाकल्‍यास त्‍या बॉलमधील बीया चांगल्‍या रूजतात शिवाय त्‍यातील रोपांची अत्यंत वेगाने उगवन होते.

शाळेत विद्यार्थी मित्रांनी बनवलेले हे सीड बॉल  चौढाळा परिसरातील माळ रानावर व विहामांडवा-चौढ़ाळा या तीन किलो मीटर रस्त्याच्या बाजूने टाकले जाणार असून, हे सीड बॉल हे कमीत कमी पाण्यात व प्रतिकूल वातावरणात येणाऱ्या झाडांचे बनवले गेले आहेत. शाळेत तयार केलेले सीड बॉल हे सामाजिक वनीकरण विभाग,सामाजिक संस्था व शरद सहकारी साखर कारखाना यांना देण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे सचिव प्रशांत नरके यांनी दिली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलानां सीड बॉल तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका रेणुका कुलकर्णी,प्रियंका थोटे,मयूर गायकवाड़,मोनिका बोडखे,पायल कोळपकर,सुमय्या शेख,माधुरी काळे,अश्विनी नाचण,राजेंद्र वाकडे,सुंदर थोरे, यांनी सहकार्य केले.