होमपेज › Aurangabad › ट्रॅव्हलबसने रूग्णवाहिकेला दिली धडक;२ ठार १० जखमी

ट्रॅव्हलबसने रूग्णवाहिकेला दिली धडक;२ ठार १० जखमी

Published On: Apr 25 2018 7:40PM | Last Updated: Apr 25 2018 7:40PMवाळूज प्रतिनिधी

वाळूज भागातील महिलांच्या कुंटुबनियोजनाच्या शस्ञक्रिया भेंडाळा प्राथमिक आरोग्य केद्रातील कॅम्पमध्ये मंगळवारी करण्यात आल्या. त्यातील 12 महिलांच्या शस्ञक्रिया आटोपून त्यांना आपआपल्या घरी घेऊन जाणार्‍या शासकीय रूग्णवाहिकेला जिकठाण फाट्यालगत भरधाव येणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात दोन महिला ठार तर अन्य दहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सदरची घटना आज बुधवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी खाजगी बसचालकास अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याविषयी वाळूज पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, भेंडाळा आरोग्य केंद्रात मंगळवारी महिलांसाठी शस्ञक्रिया कॅम्प ठेवण्यात आला होता. त्या कॅम्पमध्ये वाळूजनजीकच्या जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अनेक महिलांच्या शस्ञक्रिया करण्यात आल्या. शस्ञक्रिया केलेल्या 12 महिलांना शासकीय रूग्णवाहिका क्रंमाक एम एच 20- 9573 या गाडीने आज पहाटे आपल्या घरी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पहाटेच सदरचे वाहन महिलांना घेऊन जिकठाणकडे निघाले होते. सदरची गाडी जिकठाण जवळ येताच मुख्यमहामार्गावर पुणे येथून औंरगाबादच्या दिशेने भरधाव वेगात धावणार्‍या कोंडुसकर एम.एच.20- 9540 या गाडीने महिलांच्या रूग्णवाहिकेला मागून जोराची धडक दिली. त्यात जानकाबाई जनार्धन पवार (वय 60) रा.दिघी व ताराबाई ज्ञानेव्वर बहादुरे (वय 50) रा.लहान्याची वाडी ता.फुलंब्री या ठार झाल्या आहेत, तर उर्वरित दहा महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्या महिलाची नावे अशी-जनाबाई बाळकृष्ण थोरात (वय 50) रा.जिकठाण,लक्ष्मीबाई बंडू बोडखे (वय 45) रा.जिकठाण,संतोष नारायण वायसळ (वय 30) रा गणेशवाडी,मिना सखाराम सावंत(वय 28) रा.राजुरा,जनाबाई लक्ष्मण बाराहाते (वय 26) रा.दिघी,वैशाली गोकुळ बोबडे(वय 26) शिरोडी,कविता आत्माराम थोरात (वय25) रा.जिकठाण,अनिता संतोष वायसळ (वय24) रा.गणेशवाडी,प्रसाद आत्माराम थोरात (वय3) रा.जिकठाण,कविता संतोष घोडके व (वय20)रा.कंरजगाव ता.वैजापुर आदीचा समावेश आहे. ज्या बसने रूग्णवाहिकेला धडक दिली त्या खाजगी बसमध्ये एकुण 45 प्रवासी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही अशी माहीती सहा.फौ.साठे यांनी दिली. घटनेची माहीती मिळताच पहाटेच वाळूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दत्ताञय साठे,हेकॉ.सानप,वाळूंजे व जोशी हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना उपचारार्थ शासकीय रूग्णालयात तातडीने हलविले. खाजगी बसचालक सरफराज आय्युब शेख वय 29 रा.न्यु.पाचापेठ सोलापुर याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती पोलिसांनी खाजगी बसचालकाच्या विरोधात बस हललगर्जीपणाने चालवून रूग्णवाहिकेला पाठीमागून जोराची धडक दिली त्यात जानकाबाई पवार व ताराबाई बहादुरे यांच्या मरणास कारणीभुत व इतर महिलांना ग॔भीर जखमी केले. याप्रकरणी रूग्णवाहिकेचा चालक रविंद्र रावसाहेब गोरे (वय 40) रा.जिकठाण यांनी बसचालकाच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यापुढील तपास पोनि सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ताञय साठे हे करीत आहे.

दरम्यान शस्ञक्रिया केलेल्या महिलांना पहाटेच घरी सोडण्याचे नियोजन कोणत्या कारणास्तव करण्यात आले? हा प्रश्न वाळूज भागात चर्चिला जात आहे. शासकीय रूग्णालये दुःख निवारण करणारी की दुःख देणारी हीच चर्चा येथे सुरू आहे.