होमपेज › Aurangabad › प्रेमाच्या विविध रंगांत न्हाऊन निघाली बाजारपेठ

प्रेमाच्या विविध रंगांत न्हाऊन निघाली बाजारपेठ

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 1:57AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

व्हेलेंटाईन डे निमित्त शहरातील बाजारपेठेत चार ते पाच दिवसांपासून गिफ्ट खरेदीसाठी तरुणाईने गर्दी केली आहे. त्यात प्रामुख्याने या वर्षीचे व्हॅलेंटाईन डे चे आकर्षण म्हणजे डिजिटल ग्रीटिंग होय. या ग्रीटिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे यास पेनड्राईव्ह कनेक्ट केल्यास त्यातील जोडीदारसोबतचे फोटो तसेच व्हिडिओ पाहता येऊ शकतात. या कार्डची किंमत बाजारात रुपये 5 हजार ते 7 हजार एवढी आहे. तरीही प्रेमापुढे तरुणाईला ही किंमत कमीचवाटत आहे. 

डिजिटल ग्रीटिंगप्रमाणेच मेसेज बॉक्स, टेडीबिअर, हार्ट पिलो, स्क्रोल, क्रिस्टल हार्ट, कपल टेडी, रोजचे विविध प्रकार यांना डेज् सेलिब्रेशनच्या सप्ताहात मागणी वाढली आहे. याशिवाय हार्ट शेपच्या चॉकलेटस्ची मागणीही कायम आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट घेण्यासाठी शहरातील औरंगपुरा, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, टी. व्ही. सेंटर, निराला बाजार या भागातील गिफ्ट गॅलरीत तरुण-तरुणींनी गर्दी केली आहे.

रोजचे विविध प्रकार
प्रेमाचे प्रतीक असणार्‍या गुलाबाला या प्रेमाच्या सप्ताहात अधिकच महत्त्व आहे. त्यात हे गुलाब कधीही सुकू नये म्हणून क्रिस्टल रोज, मेटल रोज, गोल्डन रोज, लाइटिंग रोज अशा विविध गुलाबाच्या प्रकारांना मागणी वाढत आहे. हे गुलाब 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

कपल शो पीस..
कपल शो पीस हे यंदाच्या व्हेलेंटाईन डे चे विशेष आकर्षण ठरत आहे. त्यात म्युझिक, लाईट अशा सुविधा असल्याने ते प्रेमाचा रंग अधिकच वाढवत आहेत.

क्रिस्टल हार्ट
क्रिस्टल हार्ट या नावातच प्रेमाची अनुभूती येत असल्याने जोडीदाराला हे गिफ्ट देण्यासाठी प्रेमींची गर्दी बाजारपेठेत आहे. शिवाय हे गिफ्ट केवळ 60 रुपयांत बाजारात उपलब्ध आहे.

मेसेज बॉटल
जुन्या काळात जसे संदेश देण्यासाठी बाटलीमध्ये संदेश लिहिलेली चिठ्ठी टाकून ती पाण्यात सोडली जात असे. ही चिठ्ठी आपल्यापासून दूर असलेल्या प्रिय व्यक्तीला मिळेल व आपला संदेश त्याच्यापर्यंत पोहोचेल अशीच काहीशी संकल्पना वापरून या मेसेज बॉटलमध्ये प्रेमावर आधारित असे संदेश लिहिलेले आहेत. या गिफ्टलाही अधिक मागणी दिसत आहे.