Tue, Jul 14, 2020 06:00होमपेज › Aurangabad › औरंगाबाद मनपात राडा, एमआयएमचे ५ नगरसेवक निलंबित (Video)

औरंगाबाद मनपात राडा, एमआयएमचे ५ नगरसेवक निलंबित (Video)

Published On: Jun 13 2019 12:37PM | Last Updated: Jun 13 2019 1:27PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीनंतरची औरंगाबाद महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्‍त ठरली. नवनिर्वाचित खासदार इमतियाज जलील यांचा अभिनंदन ठराव आणि आणि शहरातील पाणी प्रश्न यावरून सभेत प्रचंड गदारोळ झाला. एमआयएम सदस्यांनी सुरुवातीला खासदार जलीन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. अफसर खान यांनी त्यास तीव्र विरोध केला तसेच खासदार जनी हे एक नंबरचे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोपही केला. त्याचवेळी भाजप सदस्यांनी पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावरून महापौरांच्या डायससमोर धाव घेतली. 

दुसरीकडे सदस्य अभिनंदन ठरावा घेण्यावरून आग्रह करत होते. यावेळी भाजप सदस्यांनी महापौरांच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. एकीकडे ठिय्या आंदोलन आणि सदस्यांची अभिनंदन ठरावाची मागणी यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी भाजपच्या काही सदस्यांनी महापौरांच्या डायसवरील पळविला. मात्र अफसर खान यांनी तो राजदंड परत आणून महापौर डायसवर ठेवला.

त्यानंतर थोड्याच वेळात एमआयएम सदस्यांनी हा राजदंड पळविला. या घटनेनंतर महापौर घोडले यांनी एमआयएमच्या ५ सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित केले.