Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Aurangabad › हरलोय मी.. माफ करा..; औरंगाबादेत बेरोजगार तरुणाची आत्‍महत्या

हरलोय मी..माफ करा..; तरुणाची आत्‍महत्या

Published On: Jul 07 2018 2:36PM | Last Updated: Jul 07 2018 3:37PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

सॉरी, मी सोडून चाललोय सर्वांना..मला माफ करा..खूप त्रास होतोय..हरलोय मी..आता जगू शकत नाही..मला माफ करा..मी मेल्यावर माझी किडनी दान करा..अशा आशयाचा संदेश मोबाईलवर लिहून एका बेरोजगार मुलाने आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. अमोल अशोक मिसाळ असे या २३ वर्षीय तरुणाचे नाव असून शहरातील अंबरहिल परिसरात राहणारा आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

अमोल हा एका ठिकाणी नोकरी करत होता. १५ दिवसांपूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच इतर ठिकाणीही त्याला काम मिळत नव्‍हते त्यामुळे तो तणावात होता. यातच त्याने आत्‍महत्या केली. अमोल याने आत्‍महत्येपूर्वी मोबाईलवरून कुटुंबीयांना संदेश पाठवला आहे. यात मी हरलोय, त्यामुळे आत्‍महत्या करत आहे. माझ्या आत्‍महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. तसेच माझ्या देहाचे दान करावे. काळजी घ्या, असे लिहलं आहे. 

No automatic alt text available.

अमोलच्या या हृदय पिळवटून टाकणार्‍या संदेशामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. तसेच २३ वर्षीय अमोल बेरोजगारीचा बळी ठरल्याने लोकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.