Fri, Mar 22, 2019 00:03
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › नकोती नळ योजना, आम्हाला हातपपंचेच पाणी बरे

हे गाव पण झाले असते तर्राट...

Published On: Dec 08 2017 1:57AM | Last Updated: Dec 08 2017 10:56AM

बुकमार्क करा

सोयगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील निमखेडी गावाला नळाव्दारे गावठी दारून मिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला, मात्र शेजारच्या उमरविहिरे गावाला नळ योजना नसल्यामुळे तेथील गावकरी या संकटातून वाचले. नकोती नळ योजना, आम्हाला हातपपंचेच पाणी बरे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या गावातील नागरिंकांनी दिली. दरम्यान, कुठलीही कारवाई न करता दारूचे गाळप करणार्‍या पाच जणांना केवळ समज देऊन पोलिसांनी सोडून दिले, अशी माहिती सरपंच सीमा पाटील यांनी दिली.

निमखेडी-उमरविहिरे गु्रप ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेशर) येथील धाकलेगाव धरणात आहे. या धरण पात्रात अवैधरित्या गावरान दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. या हातभट्टी धारकांनी पिण्यासाठी न वापरण्यात येणारी गुळणीची गावरान दारू नष्ट करण्यासाठी पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्यात मिसळविली.

त्यामुळे विहिरीतून साठवण टाकीत जोडणी केलेल्या पाइपलाइनमधून निमखेडीच्या ग्रामस्थांना गावरान दारूचा मोठा पुरवठा झाला होता. त्यामुळे अख्खे गावच दारूच्या नशेत तर्रर्र झाल्याचे बुधवारी उघडकीस आले होते. दरम्यान, या प्रकरणी सरपंच सीमा पाटील यांनी गुरुवारी पुन्हा पिंपळगाव (हरेशर) पोलिसांचे दरवाजे ठोठावत दोन तास ठिय्या आंदोलन करून कारवाईची मागणी केली, परंतु या पोलिसांनी धरण पात्रात दारूचे गाळप करणार्‍या पाच जणांना केवळ समज देऊन सोडून दिले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याची हेखेखोर वृत्ती पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आली आहे. तालुक्यातील निमखेडी गावाच्या ग्रामस्थांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामास जबाबदार ठरलेल्या पाचोरा पोलिसांवर कडक कारवाई होईल का? हाच प्रश्न दिवसभर सोयगावात चर्चिला गेला.

संबंधित बातमी:
वाचा : विहिरीत मिसळली दारू अन्‌ गाव झालं तर्राट!