Thu, Jun 20, 2019 02:11होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अपघातात नवरदेवसह तीन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी 

औरंगाबाद : अपघातात नवरदेवसह तीन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी 

Published On: Jun 25 2018 1:38PM | Last Updated: Jun 25 2018 3:15PMकरमाड :-
औरंगाबाद- जालना महामार्गवर सटाणा फाट्याजवळ चारचाकी गाडीच्या चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 या घटनेची  करमाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  औरंगाबाद शहरातील काही  युवक परभणी येथे कार्यक्रमासाठी सोमवार दि.२५ जून रोजी सकाळी ठीक ११ वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून-जालनाकडे जात होते. सटाणा फाट्याजवळ येताच चारचाकी गाडी (MH 04 DE 8735) वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेतील नालीत आदळली. या अपघातात चारचाकीचा दरवाजा तुटून पडला गाडी पुढे २०० फूट फरफटत जात प्लांटच्या लावलेल्या सिमेंटच्या कॉम्प्यूड पोलला धडकली. दरवाजा तुटलेला असल्याने पोलच्या जोरदार धडकेने चारचाकीतून काही प्रवाशी बाहेर फेकल्या जाऊन ते सिमेंट पोलवर आढळल्याने प्रवाशांना गंभीर मार लागला होता. करमाड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. या भीषण झालेल्या अपघातात  शहजाद युनुस शेख वय २३ रा.दिल्लीगेट औरंगाबाद, तवरेस खान राजू खान वय २४ रा. औरंगाबाद इंद्रानागर, मुज्जकरोदिन वाहिद्दोदिन शेख वय २६ रा.बायजीपुरा औरंगाबाद, अबूदबीन हसनबीन समेदा वय २५ रा.बायजीपुरा औरंगाबाद हे चार जण ठार झाले असून शफीक सलीम खान वय २४ रा.बायजीपुरा औरंगाबाद आणि उमर हसनबीन समेदा वय २४ रा. बायजीपुरा औरंगाबाद हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरदरचंद्र रोडगे हे करत आहे.