Mon, Nov 19, 2018 09:10होमपेज › Aurangabad › वाहतुकीच्या आड,चिंचेचे झाड!

वाहतुकीच्या आड,चिंचेचे झाड!

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

संग्रामनगर उड्डाणपुलावरून दर्गा चौकात उतरताना रस्त्याच्या मध्यभागी चिंचेचे मोठे झाड आडवे येते. त्यामुळे येथे नेहमी वाहतूक जाम होते. विशेष म्हणजे, अंधारात अनेकदा दुचाकीस्वार त्यावर धडकतात. तीन-चार महिन्यांपूर्वी एक तरुण येथे अपघातात गंभीर जखमीही झाला आहे. त्यामुळे हे झाड तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला, परंतु महिना उलटला तरी काहीही कार्यवाही झालेली नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी झाड तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस विभाग सतत प्रयत्नशील असतो. काही दिवसांपूर्वीच जालना रोडवरील दूध डेअरी चौक आणि आकाशवाणी चौकातील सिग्‍नल अपडेट करून पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले. दरम्यान, प्रत्येक चौकातील समस्या दूर करण्याच्या सूचना पोलिस आयुक्‍तांनी दिलेल्या असल्याने दर्गा चौकातील झाड तोडण्यासाठी पोलिसांनी मनपाच्या उद्यान अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी वृक्ष संवर्धन समितीला हे झाड दाखविले, परंतु या समितीतील काही सदस्यांनी झाड तोडण्याला विरोध केला होता, परंतु महापौर घोडेले यांनी चिंचेचे झाड तोडण्याबाबत मनपा आयुक्‍तांना सूचना दिल्या होत्या.