औरंगाबादेत आज झाली ६४ रुग्णांची वाढ

Last Updated: Jun 07 2020 9:16AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ६४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०१४ झाली आहे. यापैकी ११८४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आता जिल्ह्यात ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

औरंगाबादेतील हर्सुल कारागृहात २९ कैद्यांना कोरोना

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

भावसिंगपुरा (१),  बजाजनगर, वाळूज (१),  हिना नगर, रशीदपुरा (१), सातारा परिसर (१), बौद्ध नगर (१), मिल कॉर्नर (११), रोजा बाग (१), देवदूत कॉलनी, बजाज नगर (१), देवानगरी (१), पद्मपुरा (१), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (१), एन तीन  सिडको (१), सिंधी कॉलनी (१), मुजीब कॉलनी रोशन गेट(१), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (१), शिवाजी नगर (१), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (१), भीमनगर, जवाहर कॉलनी (१), जुना मोंढा (१), शिवशंकर कॉलनी, साई नगर (३), मुकुंदवाडी (१), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (१), तक्षशील नगर, मोंढा (३), संभाजी कॉलनी एन सहा (१), चिश्त‍िया कॉलनी (२), पैठण गेट (२), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (१), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (३), ठाकरे नगर (१), आंबेडकर नगर, एन-सात (२), बायजीपुरा (२), जटवाडा रोड (१), जुना मोंढा, भवानी नगर (१), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (१), न्यू हनुमान नगर (१), बारी कॉलनी (१), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (२), कैलास नगर (१), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (१) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (३), बोरवाडी, खुलताबाद (१) या भागातील कोरानाबाधित आहेत.  यामध्ये २७ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये ६८६ रुग्णांवर उपचार सुरू; आज ९० रुग्णांची वाढ 

ग्रामीण मधील आकडा ६० वर

आज आढळलेल्या ६४ रुग्णामध्ये ५ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. यात गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव (३), औरंगाबाद तालुक्यातील बाजाजनगरात १, आणि खुलताबाद तालुक्यातील बोरवाडी (१) रुग्णाचा समावेश आहे.