Sun, Jul 05, 2020 23:20होमपेज › Aurangabad › ‘त्या’ तीन मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

‘त्या’ तीन मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

Published On: Dec 24 2017 10:40AM | Last Updated: Dec 24 2017 10:40AM

बुकमार्क करा

लासूरगाव : प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील लासूरगाव  येथील तीन मित्रांचे 22 डिसेंबर शुक्रवार रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील खोजवाडी फाट्याजवळ अपघाती निधन झाले होते. या तिघांवर   शनिवारी  नेक मान्यवरांच्या उपस्थितीत  अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, व्यापार्‍यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद करून अंत्यविधीला हजेरी  लावली होती. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास  दानवे, आमदार सुभाष झांबड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  लासूरगाव ग्रा. पं. सदस्यमनोहर अंबादास काळे (45),   साहेबराव चांगदेव शेजूळ (44),बाळू दामोधर नेटके (51) हे तिघेजिवलग मित्र होते.

औरंगाबादकडूनलासूरगावाकडे दुचाकीवर येताना नागपूर मुंबई महामार्गावरील खोजवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात तिघांचाही मृत्यू  झाला. दरम्यान, शनिवार रोजी त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यापार्थिवांवार एकापाठोपाठ अंत्यसंस्कार  करण्यात आले. विशेष म्हणजे हे तिघेही कुटुंब प्रमुख असल्यामुळे अपघाती निधनाने त्यांच्या  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काळे यांच्या  पश्‍चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

शेजूळ यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले तर नेटके यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रा. रमेश बोरनारे, मानाजी मिसाळ, तांबे, झांबड,  भापती संभाजी पाटील डोणगावकर, दादा जगताप, कल्याण दांगोडे, सुनील कोटकर, सरपंच रणजित देशमुख,  रितेश मुनोत आदी उपस्थित होते.