Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Aurangabad › दानपेटीतून 27 हजारांचा ऐवज चोरला

दानपेटीतून 27 हजारांचा ऐवज चोरला

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 1:33AM

बुकमार्क करा
 

पाचोड : प्रतिनिधी

आडूळ (ता. पैठण) येथील महावीर चौका जवळ असलेल्या जैन मंदिरात मंगळवारी ( दि 9) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रोख रक्‍कम व सात हजार रुपये किमतीची चांदीची दागिने असा एकूण सत्तावीस हजारांचा ऐवज लांबविला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महावीर चौकाजवळ जैन मंदिर आहे. या  मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सात हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, दान पेटीतील रोख रक्‍कम वीस हजार असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी दर्शनासाठी गेलेल्या येथील ग्रामस्थांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळविली. यानतंर सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, कल्याण राठोड, शिवाजी जाधव, रामदास राख आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. चोरट्यांनी मंदिरातून चोरलेली दानपेटी गावाच्या लगतच असलेल्या ज्ञानेश्‍वर लक्ष्मण वाघ यांच्या शेतात सापडली. 

घटनास्थळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी भेट दिली. घटनास्थळी ठसेतज्ञ व श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. चोरटे येथील ग्रामस्थ बाळकृष्ण प्रभाकर छडीदार व हाजी रहेमान अत्तार यांच्या घरातही शिरले होते, परंतु येथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.