Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्यावर डांबर (Video)

औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्यावर डांबर (Video)

Published On: Mar 10 2018 1:22PM | Last Updated: Mar 10 2018 2:29PMऔरंगाबादः प्रतिनिधी

देशभरात पुतळ्यांची विटंबना करण्याचे सत्र सुरू आहे. त्रिपुरातील लेनिनचा पुतळा पाडल्यापासून विविध राज्यात पुतळा पाडणे, विटंबना करणे अशा घटना घडत आहेत. असाच प्रकार आज औरंगाबादमध्ये घडला आहे. 

औरंगाबादमधील समर्थनगर येथे सावरकर चौकातील सावरकर यांच्या पुतळ्यावर रात्री काही अज्ञातांनी डांबर फेकले. या घटनेमुळे शहरात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार रात्री नेमका कधी घडला हे समजू शकले नाही. सकाळी पालिकेच्या सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

त्यानंतर सकाळी नागरिकांनी पुतळ्यासमोर गर्दी केली. पोलिसांनी नराधमांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली. नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी पुतळा स्वच्छ करून त्याला पूर्वीचा होता तसा रंग दिला. घटनास्थळी पोलिसांनी आरोपींना लवकरात-लवकर पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.