Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : ‘तुम्ही आमचे नळ कनेक्शन तोडले, त्यांचेही तोडा’(फोटो) 

औरंगाबादेत नेमके काय झाले; पाहा फोटो फिचर!

Published On: May 12 2018 10:54AM | Last Updated: May 12 2018 1:21PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

‘तुम्ही आमचे नळ कनेक्शन तोडले, त्यांचेही तोडा’ नळ कनेक्शन तोडण्याच्या या किरकोळ वादातून दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर जाळपोळ आणि हिंसाचारात झाले. या वादाने २ जणांचा नाहक बळी घेतला. या वादामुळे कचरा प्रश्नी पेटून शांत झालेले औरंगाबाद शहर पुन्हा एकदा पेटले आहे. 

अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याच्या मोहीमेत पहिल्या दिवशी एका धार्मिक स्थळाचे अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडले. यावरून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

Image may contain: fire and outdoor

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात 

No automatic alt text available.

दहडफेकीनंतर जमावाने तोडफोड, जाळपोळ देखील केली. यावर प्रतिक्रिया म्हणून दुसरा गट देखील रस्त्यावर 

Image may contain: outdoor

Image may contain: outdoor

शहरातील सर्व बंदोबस्त मोतीकारंजा येथे तैनात करण्यात आला 

Image may contain: 1 person, standing, night and outdoor

अभिनय टॉकीज ते मोतीकारंजा रस्त्यावर जमाव तीव्र होता. दगड, काठ्या, तलवारी घेऊन जमाव समोरच्या गटावर हल्ला 

Image may contain: one or more people

अश्रुधुराचे नळकांडे फोडले, हवेत गोळीबार केला, तरीही जमाव पांगला नाही

Image may contain: one or more people, people standing, night and outdoor

गांधीनगरच्या गटाने कुलर विक्रेत्यांची दुकाने फोडत जाळपोळ केली, तर मोतीकारंजा भागातील गटाने गांधीनगरमधील घरांमध्ये घुसून तलवारीने हल्ला केला

Image may contain: car and outdoor

या घटनेत नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत 

Image may contain: outdoor

जमावाने शहागंजमध्ये केलेल्या जाळपोळीत एकाचा तर पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला  
Image may contain: fire, night and outdoor

Image may contain: 6 people, including Avinash Garud AG, people smiling, people standing and outdoor