Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Aurangabad › जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांचे सर्वेक्षण करणार

जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांचे सर्वेक्षण करणार

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:46AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबवूनही जिल्हा प्रशासनाला वाळूपट्ट्यांंचा ठेका देण्यात यश आलेले नाही. सात वाळूपट्ट्यांंचा लिलाव झाला असला, तरी प्रत्यक्षात ताबा अद्याप दिलेला नाही. एकही वाळूपट्ट्यांचा ठेका गेलेला नसतानाही, जिल्ह्यात व शहरात वाळू कुठून येतेय, असा प्रश्‍न जिल्हा प्रशासनाला पडला आहे. लिलावासाठी निवडलेल्या वाळूपट्ट्यांत तीन महिन्यानंतरही वाळू आहे का, या वाळूपट्ट्यांत बेकायदा उपसा सुरू आहे का, याची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्‍त करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीसाठी वाळूपट्ट्यांचा ठेका देण्याची मुदत आहे, यंदा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 31 वाळूपट्टे लिलावासाठी निवडले असून 60 कोटीचा महसूल मिळण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. अद्यापपयर्र्ंत सात वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला असून, ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दुसरीकडे गेल्या तीन वषार्र्ंपासून जिल्ह्यातील वाळूपट्टे घेण्याकडे ठेकेदारांकडून पाठ फिरवली जात आहे. यंदाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. सात वाळूपट्ट्यांपैकी एकाचाही ताबा खरेदीदाराला दिलेला नाही, असे असतानाही शहर परिसरामध्ये वाळू वाहतूक आणि विक्री सर्रास सुरू आहे. जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांची लिलावासाठी निवड करताना तिथे असलेला वाळूसाठा आणि आज तीन महिन्यानंतरचा साठा किती, याचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने एक पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच वाळूपट्ट्यांची तपासणी करून हे पथक सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.