Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दहावीच्या विद्यार्थाची आत्महत्या

औरंगाबाद : दहावीच्या विद्यार्थाची आत्महत्या

Published On: Jan 19 2018 1:16PM | Last Updated: Jan 19 2018 2:16PM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

येथील एमजीएमच्या क्‍लोरडेल शाळेत शिकणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्याने आत्‍महत्येची घटना घडली आहे. प्रज्‍ज्‍वल विजय देसाई असे या १५ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेकानंदपुरम, उस्‍मानपुरा येथील राहत्या घरात त्याने गळफास घेतला.

घरात कोणी नसताना त्याने घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला. प्रज्‍ज्‍वल याच्या आत्‍महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.