Sat, Jul 04, 2020 07:16होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : सातवीच्या विद्यार्थ्याकडून कोरोना वाॅरियर्ससाठी रोबोटची निर्मिती!

औरंगाबाद : सातवीच्या विद्यार्थ्याकडून कोरोना वाॅरियर्ससाठी रोबोटची निर्मिती!

Last Updated: May 29 2020 12:00PM

साई रंगदल आणि त्याने औरंगाबादमधील रूग्णांसाठी तयार रोबोटऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तुटता तुटत नसल्याने कोरोनाचे रूग्ण राज्यात वाढतच आहेत. तसेच कोरोनाच्या बाधितांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, पोलिस आणि क्वॉरंटाईन सेंटरमधील कर्मचारी यांनाच कोरोनाची बाधा होत आहे. तसेच उपचार करताना जर सोशल डिस्टन्सिंगचा विचार केला तर उपचार करायचा कसा? लोकांची सुरक्षितता महत्वाची असताना आपण दूर राहून हे करणार कसे असे अनेक प्रश्न पडत आहेत. या प्रश्नांवर औरंगाबाद येथील एका ७ वी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उत्तर शोधले आहे. साई सुरेश रंगदल असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने औरंगाबादमधील रूग्णांसाठी रोबोट तयार केला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १४०० वर

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्वाचे आहे. तितकेच कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करणेही. मात्र कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टर, परिचारीका, पोलिस आणि क्वॉरंटाईन सेंटर मधील कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे साई ने औरंगाबादमधील रूग्णांसाठी औषध आणि अन्नाचे संपर्कविरहित वितरण करण्यासाठी एक रोबोट तयार केला. 

औरंगाबादेत कोरोना मीटरमध्ये ४६ ने वाढ!

हा तयार केलेला रोबोट बॅटरीने चालविला येतो. तर त्याचे नियंत्रण स्मार्टफोनद्वारे केले जाऊ शकते. तसेच हाताळण्यात अतिशय सोपे असून १ किलोपर्यंत वजनाच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो. 

या रोबोटची रचना करण्यामागील हेतू म्हणजे कोरोनोच्या रूग्णांशी वैद्यकीय कर्मचार्‍यांचा शारिरीक संपर्क कमी करणे. तसेच डॉक्टर, परिचारिका, पोलिस आणि क्वॉरंटाईन सेंटर मधील कर्मचारी यांना कोरोना पासून दूर ठेवणे आहे. 
- सई सुरेश रंगदल,  रोबोट रचनाकार