Wed, Apr 01, 2020 10:28होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कचऱ्यात दगड-माती टाकून डल्ला मारणाऱ्या रेड्डी कंपनीला झटका

औरंगाबाद : कचऱ्यात दगड-माती टाकून डल्ला मारणाऱ्या रेड्डी कंपनीला झटका

Last Updated: Mar 25 2020 12:12PM
चौकशी समितीच्या अहवालात ठपका; मोठा आर्थिक दंड

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

कचऱ्यात दगड, माती, विटा टाकून मनपाची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या रेड्डी कंपनीला चांगलाच दणका बसला आहे. रेड्डी कंपनीला सुमारे बावीस लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

मनपाने शहरात घरोघरी कचरा संकलन व वाहतुकीचे कंत्राट बंगळूरच्या कंपनीला दिले आहे. या कंपनीला प्रतिटन १८६५ रुपये प्रमाणे कचऱ्याच्या वजनावर मोबदला दिला जातो. त्यामुळे कंपनीने वजन वाढवण्यासाठी कचऱ्यात दगड, माती, विटा टाकल्याचा प्रकार फेब्रुवारीमध्ये उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे वजन सुमारे २५ टनाने कमी झाले होते.