Fri, Aug 23, 2019 15:08होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : ‘भाजपच्या नेत्यासमोर कशा पायघड्या घालतात’ खैरे संतप्त

औरंगाबाद : ‘भाजपच्या नेत्यासमोर कशा पायघड्या घालतात’ खैरे संतप्त

Published On: May 19 2018 12:01PM | Last Updated: May 19 2018 2:21PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

दंगल हाताळण्यात पोलिस अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज (१९ मे) शहरात ‘हिंदू शक्‍ती मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी हजारो शिवसैनिक पैठण गेटवर जमा झाले आहेत. थोड्याच वेळात मोर्चाला सुरूवात होणार आहे. या मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात येत असल्याने तो पैठण गेटजवळच अडवण्यात आला. या मोर्चाला महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद शिवसेना प्रमुख अंबादास दानवे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित आहेत.

दरम्यान, ‘हिंदू शक्‍ती मोर्चा’ला कायदा व सुव्यवस्था आणि शांततेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी काल (१८ मे) दिली होती. तरीही शिवसेनेने शांततेत मोर्चा काढला तर ठीक, अन्यथा गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करू, असा इशाराही पोलिस आयुक्‍तांनी दिला होता.

लाईव्ह अपडेट :

>मोर्चा जागेवरच विसर्जित करा, पोलिस उपायुक्त श्रीरामे, विनायक ढाकणे यांची आंदोलकांना विनंती

> श्रीमान श्रीमती कापड दुकानापाशी मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी लावले बारकेट 

> पोलिसांनी रस्ता आडविल्याने मोर्चाचा मार्ग बदलला; मोर्चेकरी एस.बी.कॉलेजकडून जिल्हा परिषद मैदानाकडे रवाना

> शिवसेनेच्या मोर्चावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; कलम 144 लागू असताना मोर्चा काढल्याने सरस्वती भवन मैदान येथे मोर्चेकरी ताब्यात

>सरस्वती भूवन मैदानावर मोर्चा विसर्जित

>शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेसह शिस्तमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन द्यायला पोहोचले

आमदार खैरे संतप्त

मोर्चा विसर्जित केल्यानंतर आमदार चंद्रकांत खैरे हे स्वत: विभागीय आयुक्तालयात दाखल झाले. पण, आयुक्तच जागेवर नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आयुक्तांनाच निवेदन देणार आहे. त्यांनाच बोलवा  आशी भूमिका खैरेंनी घेतली आहे. ‘भाजपच्या नेत्यासमोर कशा पायघड्या घालतात’ असे खैरेंनी महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांना सुनावले. 
 

मोर्चा काढणारच 

पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारलेली आहे. त्यांनी परवानगी देवो अथवा ना देवो आम्हाला काही फरत पडणार नाही. शिवसेना मोर्चा ठरलेल्या वेळी ठरलेल्या मार्गानेच काढणार आहे. पोलिसांनी काही कारवाई केली तरी आम्हाला काही फरक पडत नाही, शिवसेना जिल्हाप्रमुख असे अंबादास दानवे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते. 

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

शिवसेनेच्या या मोर्चाला तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एसआरपीच्या सात कंपन्या, तीन उपायुक्‍त, सहा सहायक आयुक्‍त व पोलिस कर्मचारी असा एकूण अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त मोर्चाच्या मार्गावर राहणार आहे.