होमपेज › Aurangabad › माजलगावात मूकमोर्चा

माजलगावात मूकमोर्चा

Published On: Mar 02 2018 1:22AM | Last Updated: Mar 01 2018 11:07PMमाजलगाव : प्रतिनिधी

शिवजन्मोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टरची तालखेड येथे विटंबना करण्यात आली होती. त्या समाजकंटकावर कारवाई व्हावी, यासाठी माजलगाव शहरात गुरुवारी मूकमोर्चा काढण्यात आला.

माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी शिव जयंतीनिमित्त महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञात समाज कंटकाने फाडून विटंबना केली. सदरील दोषीला पकडून शिक्षा व्हावी. यासाठी कल्याण विशाखापटनम महामार्गावर दोन दिवसांखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. दोन दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नसल्याने गुरुवारी शहरातील हनुमान चौक ते तहसील कार्यालय असा मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी दोषींवर कारवाईचे निवेदन सादर करण्यात आले. या मूकमोर्चात तालखेडसह परिसरातील शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती होती.