Fri, Sep 21, 2018 03:39होमपेज › Aurangabad › शिवजयंतीवरून औरंगाबादमध्ये तुंबळ हाणामारी

शिवजयंतीवरून औरंगाबादमध्ये तुंबळ हाणामारी

Published On: Feb 28 2018 8:51PM | Last Updated: Feb 28 2018 8:51PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

समर्थनगरमध्ये शिवजयंती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि. 28) सायंकाळी मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामुळे त्या भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. परंतु, शहरात पुन्हा अशांतता निर्माण झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. परंतु, शिवसेनेतर्फे दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची प्रथा आहे. यंदाही ४ मार्च रोजी शिवसेना शिवजयंती साजरी करणार आहे. त्यासाठी उत्सव समिती जाहीर करण्यात आली असून या समितीतर्फे बुधवारी कार्यालयाचे उद्घाटन आयोजित केले होते. समर्थनगरात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी शिवजयंती साजरी करण्यावरून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यावरून वाद उद्भवला. शाब्दिक चकमक सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी थेट हाणामारीला सुरूवात केली.