Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Aurangabad › कळंबमध्ये साकारली शिवाजी महाराजांची भव्‍यदिव्‍य रांगोळी

कळंबमध्ये साकारली शिवाजी महाराजांची भव्‍यदिव्‍य रांगोळी

Published On: Feb 17 2018 1:56PM | Last Updated: Feb 17 2018 1:56PMकळंब ( प्रतिनिधी )

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त शहरातील क्रीडा संकूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ हजार २०० स्क्वेअर फुटची भव्य प्रतिमा रांगोळीतून एकट्या कलाकाराने साकारली आहे . शहरात पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त भव्य कलाकृती काढण्यात आली होती त्याचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कळंब येथील श्रीमंतयोगी युवा मंचाने यासाठी पुढाकार घेतला होता.

या रांगोळीचे उद्‌घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंबचे तहसीलदार अशोक नांदलगावकर, काँग्रेस आयचे युवक सरचिटणीस अनंत लंगडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत धस, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, ठेकेदार विलास पाटील  उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, रोहितराजे दंडनाईक, नगरसेविका मिनाक्षीताई हजारे, नगरसेवक अमर गायकवाड, रिपाई नेते डी. जी. हौसलमल, भाजपचे शहराध्यक्ष संदीप बावीकर, जि प सदस्य बालाजी जाधवर, नगरसेवक अमर गायकवाड, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे, डॉ.रमेश जाधवर,डिकसळ ग्रा प सदस्य कुणाल मस्के, प्रा.संजय घुले, सुमित बालदोटा ज्योती सपाटे, तनपुरे ताई यांच्या सह शहरातील नागरिक, महिला उपस्थित होते. 

पूर्व पश्चिम १२० आणि दक्षिण उत्तर १६० अशी एकूण १९२०० स्के.फु रांगोळी राजकुमार दत्तात्रय कुंभार या एकट्या कलाकाराने साकारली असून याचा पुढाकार कळंब येथील श्रीमंतयोगी युवा मंचाने घेतला आहे.शिवाजी महाराज यांची रांगोळीतून शिवप्रतिमासाठी ४७२० किलो रांगोळी लागली आहे.ही रांगोळी ३१ तास आणि ४५ मी पूर्ण करण्यात आली आहे.

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राजकूमार दत्तात्रय कुंभार यांची परिस्थिती नाजूक असतानासुद्धा यांनी स्वत: च्या कर्तृवावर आपली रांगोळीची कला जोपासली असुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुंभार यांना लहानपणापासून रांगोळी काढण्याची आवड होती. मग याच आवडीचे रुपांतर कलेत करत रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली .मागील काही दिवसापुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन हजार स्क्वेअर फुट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती काढली होती. याला ५९० कीलो रांगोळी लागली होती ही कलाकृती तयार करण्यासाठी १३ तास काम केले होते. त्यानंतर लातूर तालुक्यातील तांदूळजा येथे जिजाऊ माता ची ७२०० स्क्वेअर फूट ची रांगोळीतून भव्य प्रतिमा साकारली होती. या करीता  १८०० कीलो रांगोळी लागली होती आणि १८ तास ही रांगोळी काढण्यासाठी लागले होते. तसेच अनेक लहान मोठ्या एक हजार च्या आसपास विविध महापुरुषांच्या कलाकृती रांगोळीतून काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे .