Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Aurangabad › शिव छत्रपतींचा जयघोष

शिव छत्रपतींचा जयघोष

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी झाली. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी नऊ वाजता क्रांतीचौकातील महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर क्रांती चौकातून वाहन रॅली काढून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वाहन रॅलीचा टीव्ही सेंटर येथे समारोप झाला.

राजाबाजार संस्थान गणपती मंदिरापासून सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत देखावे, ढोल पथक, भजनी मंडळी, बॅण्ड पथक यांचा समावेश होता. उपस्थित शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘मॉ साहेब जिजाऊ यांचा विजय असो’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय भवानी जय शिवराय’ असा जयघोष केला. राजाबाजार येथून निघालेली भव्य मिरवणूक शहागंज मार्गे सराफा बाजार, मछली खडक, गुलमंडी, पैठण गेट, क्रांती चौकात मिरणुकीचा समारोप झाला. महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, पृथ्वीराज पवार, बसवराज मंगरूळे, आ. संजय सिरसाट, दयाराम बसैये, राजू जहागीरदार, भाऊ सुरडकर, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विकास जैन, राजू शिंदे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, बाळासाहेब थोरात, सुहास दाशरथे आदींची या वेळी उपस्थिती होती.