Fri, May 29, 2020 01:03होमपेज › Aurangabad › लैगिंक शोषण करणारा महाराज गजाआड 

लैगिंक शोषण करणारा महाराज गजाआड 

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 1:38AM

बुकमार्क करा

पैठण : प्रतिनिधी

वारकरी शिक्षण संस्थेतील 11 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणार्‍या गणेश लक्ष्मणराव तौर (रा. वाघाडी) या फरारी आरोपीला पोलिसांनी मंगळवारी आपेगाव परिसरात अटक केली.   

पोलिसांच्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील नाथफार्म हाऊसवर रामेश्वर भगवान या  नावाने वारकरी शिक्षण संस्था आहे. याठिकाणी शेजारच्या जिल्ह्यातील जवळपास 17 बालके वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात. याच संस्थेत तौर हा विद्यार्थ्यांना शिकवत होता. रविवारी संस्थेला सुटी असल्याने सर्व मुले बाहेर खेळत होती. हिच संधी साधून तौर याने दुपारी एका 11 वर्षीय विद्यार्थ्यास अंग दाबण्याच्या बहाण्याने आपल्या रुममध्ये बोलावले. त्यानंतर रुमचा दरवाजा बंद करून या बालकावर लैगिंक अत्याचार केला.

त्यानंतर पीडित मुलाने आरडाओरड केली असता इतर मुलांनी खिडकीतून डोकावले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. दरम्यान, या घटनेची माहिती मुलांनी गावातील पालकांना दिली. सोमवारी पीडित मुलाचे पालकाने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दरम्यान, याप्रकरणी महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी संस्थेतील विद्यार्थी पैठण पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर पोलिसांनी महाराजाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी फरार झाला होता. दरम्यान, सदर आरोपी आपेगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास आधिकारी विलास घुसिंगे यांनी त्याला मंगळवारी अटक केली.